Thu, Nov 22, 2018 16:34होमपेज › Sangli › अखेर स्पीडब्रेकरवर मारले पट्टे

अखेर स्पीडब्रेकरवर मारले पट्टे

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:14PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-मिरज रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रशासनाने या रस्त्यावर ठिकठिकाणी स्पीडब्रेकर बनवले आहेत. नुकताच सांगली चर्च आणि जिल्हा परिषदेसमोर नव्याने स्पीडब्रेकर बनवला आहे. मात्र यावर पांढरे पट्टेच मारले नव्हते. त्यामुळे एकाला जीव गमवावा लागला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. 

याबाबत दैनिक पुढारीने वृत्त दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. सोमवारी या स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत.   रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग वाढल्याचे  निदर्शनास आले. त्यानंतर या रस्त्यावर वर्दळीच्या तसेच छेद रस्त्याच्या ठिकाणी मोठ्या आकाराचे स्पीडब्रेकर बनवण्यात आले आहेत. ते तयार करून पंधराहून अधिक दिवस झाले तरी त्यावर अद्याप पांढरे पट्टे मारलेले नव्हते. 

त्यामुळे वाहनचालकांना या स्पीडब्रेकरचा अंदाज  येत नव्हता. परिणामी वाहने एकमेकांवर धडकून किंवा पलटी होऊन सतत अपघात होत असत. या स्पीडब्रेकरमुळे वॉन्लेसवाडीतील एकाला जीव गमवावा लागला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. पोलिसांच्या वाहतूक शाखेने पत्र देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने पट्टे मारण्याकडे दुर्लक्ष केले होते.  याबाबत दैनिक पुढारीत  वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर  बांधकाम विभागाने सोमवारी दोन्ही स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारले आहेत.