Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Sangli › मिरजेत शनिवारी उज्ज्वल निकम उलघडणार मुलाखतीतून जीवनपट

मिरजेत शनिवारी उज्ज्वल निकम उलघडणार मुलाखतीतून जीवनपट

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 11:16PM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रकट मुलाखतीतून त्यांचा जीवनपट उघडणार आहेत. स्कूलला 50 वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 30) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी यांनी दिली. 

ते म्हणाले, गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रम राबविले. शनिवारी दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. जेष्ठ लेखक अनिल अवचट यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुलाखत होईल. लेखक अच्युत गोडबोले, नाट्य कलाकार संदीप खरे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी आबासाहेब आळतेकर, डॉ. रणजित चिडगुपकर, अतिष अग्रवाल, मिलिंद अग्रवाल, प्रभात हेटकाळे, विकास पाटील, संजय व्हावळ यांच्यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.