Tue, Jun 18, 2019 23:09होमपेज › Sangli › उद्धव ठाकरे यांचे वसंतदादांना अभिवादन  

उद्धव ठाकरे यांचे वसंतदादांना अभिवादन  

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली  ः प्रतिनिधी  

राज्याचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते. महापौर हारुण शिकलगार यांनी उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार गजानन किर्तीकर, आमदार अनिल बाबर, सांगली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर शिवसेना संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, सांगली शिवसेना जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार,  संजय विभुते, दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने, उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगले,  मिरज तालुका काँगेस अध्यक्ष आण्णांसो कोरे, वसंतदादा कारखाना व्हा. चेअरमन सुनील आवटी, उपस्थित होते.