Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Sangli › नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटीने वाट लावली : ठाकरे

नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटीने वाट लावली : ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बुधगाव : वार्ताहर

केंद्रातील व राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला फसवून डोक्यावर वरवंटा फिरविला. या सरकारने जनतेला चिरडण्याचे काम सुरू केले आहे. नोटबंदी, कर्जमुक्‍ती व जीएसटीने वाट लावली, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  केली.

मिरज तालुक्यातील बुधगाव येथे शिवसेनेच्या वतीने ठाकरे यांची शेतकर्‍यांशी संवाद सभा आयोजित केली होती. यावेळी ठाकरे यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारला चांगलेच फटकारले. या सरकारने कर्जमुक्‍तीसारखी फसवी घोषणा केली. नोटबंदी व जीएसटीने काय लाभ झाला का असा सवाल त्यांनी केला. या सरकारने असल्या योजना आणून जनतेला चिरडण्याचेच काम सुरू केले आहे. सरकारने नोटबंदी, जीएसटीने व्यापारी व उद्योगधंद्यांची वाट लावली आहे. जनतेला कोणी वाली राहिला नाही. यासाठी मी जनतेसाठी रस्त्यावर उतरलो आहे. शिवरायांनी जसे रयतेवर अन्याय करणार्‍या अफझलखानचा कोथळा बाहेर काढला. तसेच जनतेवर अन्याय करणार्‍यांचा कोथळा बाहेर काढू. सरकारने शिवसेना सत्तेत असली तरी मी गप्प बसणार नाही. यांनी जरी मला देशद्राही म्हटले तरी चालेल. यांनी बोलले तर हिंदूत्वप्रेम व इतरांनी बोलले तर देशद्रोह असे चालणार नाही. 

यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते उपस्थित होते. संयोजन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख सतीश मस्के, सतीश खांबे, ग्रामपंचायत सदस्य पी.के.इंगळे, रामदास पाटील, धोंडीराम पाटील,  यांनी केले.