Sun, Apr 21, 2019 03:52होमपेज › Sangli › सावळजजवळ अपघातः दोन युवक जखमी

सावळजजवळ अपघातः दोन युवक जखमी

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:14AMतासगाव : शहर प्रतिनिधी

सिध्देवाडी - सावळज रस्त्यावरील गोसावी ओघळ येथे सोमवारी दुपारी  मिनीबस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील दोन महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाले. एक किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमींना मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राहुल रंगराव बाबर (वय 19), प्रशांत नागेश मदवान (वय 17) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ॠषीकेश महादेव चव्हाण (वय 17, तिघेही रा. सिध्देवाडी) हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी ः सिध्देवाडी येथील राहुल, प्रशांत  व ऋषीकेश हे तिघे एकाच दुचाकीवरुन (एम.एच. 10 ए.जे. 5041) तासगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले होते. प्रवेश घेऊन ते गावाकडे परतत होते. सावळजपासून दोन कि.मी. अंतरावर समोरुन येणार्‍या मिनीबसची व  दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात हे तरुण रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. या अपघाताची तासगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.