Wed, Nov 21, 2018 21:26होमपेज › Sangli › दुचाकींच्या धडकेत एक ठार

दुचाकींच्या धडकेत एक ठार

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 29 2018 12:19AMसांगली : प्रतिनिधी

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण ठार झाला. सातगोंडा बाळगोंडा पाटील (वय 50, रा. कुपवाड) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत एकाविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आनंद गणपती देसाई (वय 25, रा. कवठेपिरान) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पाटील कुटुंबासमवेत कुपवाड येथे राहतात. शनिवारी सकाळी ते दुचाकीवरून (एमएच 10 बीव्ही 855) कवठेपिरानकडे निघाले होते. साडेसातच्या सुमारास लक्ष्मी फाटा येथे आल्यानंतर समोरून आनंद देसाई त्याच्या दुचाकीवरून (एमएच 10 सीजी 2212) येत होता. त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये ते रस्त्यावर आपटले. यात  त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. 

तेथे उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात आनंद देसाईविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Tags : Sangli Islampur road, Two-wheeler accident, One killed,