Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Sangli › जिल्ह्यातून दोन हजार शिक्षक उद्या औरंगाबाद मोर्चात 

जिल्ह्यातून दोन हजार शिक्षक उद्या औरंगाबाद मोर्चात 

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:57PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांना अडचणीत आणणारे बदली धोरण रद्द करून नवे सर्वसमावेश बदली धोरण राबवावे, ‘23/10’ चे परिपत्रक रद्द करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून 2 हजार शिक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी दिली. 

जिल्हा शिक्षक संघाची सांगलीत बैठक झाली. शिक्षकांच्या प्रश्‍नांवर होणार्‍या आंदोलनाबाबत चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष शिंदे, सरचिटणीस गुरव, नंदकुमार खराडे, राजाराम कदम, वसंत शिणगारे व पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद येथील मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय झाला. शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता प्राथमिक शिक्षण क्षेत्राच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. तीव्र आंदोलन केले पाहिजे. औरंगाबाद येथील मोर्चा ही आंदोेलनाची पहिली पायरी आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, अशी भूमिका शिंदे व गुरव यांनी मांडली. 

शिंदे व गुरव म्हणाले, शाळांच्या समानीकरणाच्या नावाखाली वाडी-वस्तीवरील शिक्षण संपविण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा झाली पाहिजे. विनंती बदली मागणीनुसार व्हावी. दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातून दोन लाख शिक्षक औरंगाबाद येथील मोर्चात सहभागी होणार आहेत. शासनाला याची दखल घ्यावी लागेल. 

Tags : sangli, sangli news, Two thousand teacher,  district, tomorrow, Aurangabad marcha,