Thu, Jul 18, 2019 02:48होमपेज › Sangli › बागणीचा तरुण अपघातात ठार

बागणीचा तरुण अपघातात ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आष्टा : प्रतिनिधी 

येथील शहरातील प्रमुख रस्त्यावर दोन मोटारसायकल आणि कारच्या झालेल्या तिहेरी अपघातात बागणीचा तरुण ठार झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

संभाजी रघुनाथ जाधव (वय 32, रा. बागणी ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  दरम्यान, आष्टा पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या वेळकाढूपणामुळे शवविच्छेदनासाठी सुमारे तीन तास मृतदेह अडकून पडला होता. यावेळी बागणी येथील ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, जाधव हे मोटारसायकल (एम.एच. 10-बी.सी.-7663) वरून आष्टा शहरातील मुख्य रस्त्यावरून येत होते. त्यांना समोरून येणार्‍या मोटारसायकलची जोरदार धडक बसली. त्यामध्ये जाधव हे  मोटारसायकलवरून खाली पडले. यावेळी जाधव यांना पुन्हा कारची (एम.एच.10-सी.ए. 6716) धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात मोटारसायकलस्वाराने पलायन केले.