Tue, Jul 16, 2019 10:13होमपेज › Sangli › कुंडलमध्ये अपघातात दोघे जखमी

कुंडलमध्ये अपघातात दोघे जखमी

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:34PMकुंडल :  वार्ताहर  

कुंडल (ता. पलूस)  येथे ऊस वाहतूक बैलगाडी व मालवाहतूक जीप यांच्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. 

याबाबत कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तासगाव - कराड रस्त्यावर कुंडल येथील लक्ष्मी मंदिराजवळ  दि. 27 जानेवारीरोजी पहाटे  सहा  वाजण्याच्या  सुमारास क्रांती कारखान्यास ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडी व मालवाहतूक करणारी जीप (क्रमांक एम. एच. 04 एच. वाय. 4057) यांच्यात धडक होवून रामचंद्र उर्फ चंद्रकांत दराडे व हणमंत दत्तू केदार (रा. सांगवी, ता. केज, जि. बीड)  सध्या रा. कुंडल हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात  दाखल केले आहे. जीप चालक फरारी आहे. अधिक तपास हवालदार व्ही. जी. पाटील करीत आहेत.