Sat, Jul 20, 2019 15:28होमपेज › Sangli › इस्लामपूर परिसरातील दोन टोळ्या तडीपार

इस्लामपूर परिसरातील दोन टोळ्या तडीपार

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 31 2018 12:44AMसांगली : प्रतिनिधी 

जुगार, मटका घेणार्‍या इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत टोळ्यांना सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सतरा जणांवर ही कारवाई केली आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी ही माहिती दिली. तडीपार केलेली एक टोळी अशी ः उमेश रामचंद्र पवार(वय 30, शिवाजी चौक), संभाजी बाळू गगनमाले, (47), बाबासाहेब दिनकर माने (40, राजाबागेश्‍वर), इस्माईल गुलाब खाटिक (65), संजय नामदेव नागे (43, बुरूड गल्ली), सिराज मुसा शेख (45, अकबर मोहला), प्रदीप महावीर दुगे (54), संजय रघुनाथ पाटील (38, शिवनगर) आणि दिनेश जगन्‍नाथ अवघडे (28,  साठेनगर).

 दुसरी टोळी अशी : उमेश रामचंद्र पवार (वय 30), बजरंग हणमंत माळी (35, हनुमाननगर), सुलतान बादशहा मुल्ला (39, शिवनगर), उत्तम रंगराव पाटील (50, रेठरेधरण), पाडुरंग सदाशिव घेवदे (32, रेठरेधरण), महादेव यशवंत धुरगुडे (49, माळी गल्ली), सुरेश सर्जेराव लोहार (54, रेठरेधरण), रणजित सर्जेराव गायकवाड (23, बुरुडगल्ली). 

निरीक्षक इंगळे म्हणाले, इस्लामपूर परिसरात वरील सतराजण मटका आणि जुगार घेत होते. पानटपरी, मोबाईलवर  ते मटका घेत होते. त्यांच्या विरोधात अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, तरीही त्यांच्या वागणुकीत फरक पडला नाही. उलट त्यांच्या या अवैध कृत्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.  त्यामुळे त्यांना तडीपार करण्याचा निर्णय अधीक्षक शर्मा यांनी घेतला. दरम्यान, अवैध धंदे आणि मटका  रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईत सिद्धाप्पा रुपनर, विशाल भिसे यांनी भाग घेतला.