Mon, Aug 19, 2019 00:48होमपेज › Sangli › आषाढी वारीसाठी मिरजहून दोन जादा रेल्वेगाड्या

आषाढी वारीसाठी मिरजहून दोन जादा रेल्वेगाड्या

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 8:16PMमिरज : प्रतिनिधी

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागामार्फत मिरज-कुर्डुवाडी आणि मिरज-पंढरपूर दरम्यान दोन जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज अशीही एक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे.मुंबई-पंढरपूर-मिरज विशेष रेल्वेगाडी  मुंबई येथून  दि.22 जुलै रोजी रात्री 12.20 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दि. 23 रोजी मिरजेत दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी येईल व याच दिवशी रात्री 8.55 वाजता मिरज येथून सुटेल.  दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता मुंबई येथे पोहोचेल.

दि. 19 ते 28 जुलै दरम्यान मिरज-पंढरपूर (01493/01494) व मिरज-कुर्डुवाडी (01491/01492) या दोन जादा रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मिरज-पंढरपूर जादा रेल्वेगाडी मिरज येथून पहाटे 5.30 वाजता सुटून पंढरपूरला 8.10 वाजता पोहोचेल.  पंढरपूर येथून सकाळी 9.50 वाजता सुटून मिरजेत दुपारी 1.30 वाजता येईल. मिरज-कुर्डुवाडी जादा रेल्वे मिरज येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल. कुर्डुवाडी येथे रात्री 8 वाजता पोहोचेल.  ही गाडी कुर्डुवाडी येथून रात्री 8.30 वाजता सुटून मिरजेत मध्यरात्री 12.45 वाजता येईल.