Sun, Nov 18, 2018 19:49होमपेज › Sangli › प्रणाली आत्महत्या; दोन मुली ताब्यात

प्रणाली आत्महत्या; दोन मुली ताब्यात

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:21PMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रणाली प्रकाश पाटील (वय 17, रा. साखराळे, ता. वाळवा) हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या धनंजय अनिल चोपडे (वय 20, रा. सरस्वतीनगर, वासुंबे, ता.तासगाव)  व निखील नंदकुमार पाटील (वय 20, रा. शिवनेरी नगर, कुपवाड, ता. मिरज) या दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  याच प्रकरणात  दोन अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बालन्यायालयामध्ये हजर करण्यात आले.

वाचा : तासगाव : विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

 तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः प्रणाली हिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये धनंजय व निखील यांच्यासह अन्य तीन मैत्रीणींच्या  नावांचाही उल्‍लेख केला होता. आपण या पाच जणांमुळे आत्महत्या करीत आहोत, असे तिने म्हटले होते.दरम्यान याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी दोन अल्पवयीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.