Wed, Apr 24, 2019 00:22होमपेज › Sangli › मणेराजुरीत आईला पेटविण्याचा प्रयत्न

मणेराजुरीत आईला पेटविण्याचा प्रयत्न

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 12:32AMतासगाव : शहर प्रतिनिधी

मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नशेत मुलानेच आईच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आईने घरातून पळ काढल्याने तिचा जीव वाचला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत नितीन विष्णू जमदाडे (वय 37, पाटील गल्‍ली, मणेराजुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीमती पद्मिनी विष्णू जमदाडे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः रविवारी सकाळी दहा वाजता पद्मिनी जमदाडे या घरात काम करीत होत्या. यावेळी नितीन बाहेरून दारू पिऊन आला. आई पद्मिनी 

यांच्याकडे दारु पिण्यासाठी आणखी पैसे मागू लागला. यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नितीनने शिवीगाळ करीत आईला मारण्यासाठी रागात तिच्या अंगावर धावून गेला. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत असे पद्मिनी यांनी पुन्हा ठामपणे सांगितले. 

दारुसाठी पैसे नकार दिल्यामुळे चिडलेल्या नितीनने घरातील रॉकेलचा कॅन घेऊन ते रॉकेल त्याने आईच्या अंगावर ओतले. त्यामुळे पद्मिनी यांनी त्वरीत घराबाहेर पळत काढला आणि आरडाओरड सुरू केली. यावेळी शेजारच्या लोकांनी येऊन नितीनला पकडून ठेवले. तासगाव पोलिसांनी नितीनला रात्री उशिरा अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे करीत आहेत.

Tags : sangli, Manerajuri, mother, Trying to  burn, sangli news,