Sat, Aug 24, 2019 22:22होमपेज › Sangli › जिल्ह्यातील 185 पोलिसांच्या जिल्हाअंतर्गत  बदल्या

जिल्ह्यातील 185 पोलिसांच्या जिल्हाअंतर्गत  बदल्या

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 10:21PMसांगली : प्रतिनिधी

पोलिस दलातील 185 कर्मचार्‍यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश   काढण्यात आले आहेत. पोलिसअधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशानुसार  बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोलिस ठाण्यात कार्यकाल पूर्ण झालेले, विनंती बदली, आजारी, पती-पत्नी एकत्रीकरण या कारणाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांसाठी अर्ज आल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन  प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक 21, हवालदार 54, नाईक 34, शिपाई 77  यांचा समावेश आहे. त्या शिवाय 27 कर्मचार्‍यांना आहे त्या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

एप्रिल- मे महिना सुरू झाला की पोलिसांना बदल्याचे वेध लागतात. आपली बदली कोठे होणार, चांगले ठिकाण मिळणार का आदी प्रश्‍न पडतात. पोलिस दलातील बदल्यांसाठी नियमानुसार अर्ज मागवण्यात आले होते. अधीक्षक शर्मा यांनी प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यादी कधी जाहीर होणार याकडे  कर्मचार्‍यांचे लक्ष होते. बदल्यांची यादी आज जाहीर झाली. त्यानंतर अनेक कर्मचार्‍यांच्या जीव भांड्यात पडला. काहीं मात्र निराश झाले. काही कर्मचारी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अनेक वर्षापासून तळ ठोकून होते.  आता त्यांना बाहेर जावे लागले आहे. त्यामुळे या बदल्याने कही खुशी कही गम असे वातावरण आहे. बदल्या झालेल्या कर्मचार्‍यांनी तात्काळ हजर रहावे, असे आदेश पोलिस अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत.