होमपेज › Sangli › जिल्ह्यात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

जिल्ह्यात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 7:51PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलात पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोठे बदल केले. शनिवारी रात्री आठ निरीक्षक, बारा सहाय्यक निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या एक निरीक्षक व दहा उपनिरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत. नवनियुक्त अधिकार्‍यांनी तातडीने कार्यभार घेण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. तासगाव ठाण्याच्या प्रभारीपदी अजय सिंदकर तर इस्लामपूरच्या निरीक्षकपदी संदीप कोळेकर यांची नियुक्ती केली आहे. निशिकांत भुजबळ यांची महात्मा गांधी चौक  ठाणे तर शिवाजी गायकवाड यांची मिरज शहर प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ए. एच. तनपुरे  मानव संसाधनकडून विश्रामबागला तर प्रताप पोमण यांची मानव संसाधनकडे, एस. एम. गिड्डे  विशेष शाखेकडे तर कुपवाडचे  अशोक कदम यांची सुरक्षा शाखेकडे बदली करण्यात आली आहे. 

संजयनगरचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील यांची पलूस प्रभारीपदी तर सरोजिनी पाटील यांची पलूसहून विश्रामबागला बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय कोळेकर यांची विश्रामबागला, कैलास कोडग यांची सांगली शहरकडे बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय कदम यांची मिरज ग्रामीणकडे तर निंगाप्पा चौखंडे यांची संजयनगरला बदली करण्यात आली आहे. समाधान बेले यांची मिरज ग्रामीणला तर समाधान चौरे यांची गुंडा विरोधी पथकाकडे बदली. उदय देसाई  सांगली ग्रामीणला तर विशाल पाटील यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे बदली करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक विकास जाधव यांच्याकडे कुपवाड एमआयडीसी ठाण्याचा प्रभारी कार्यभार, पुष्पलता मंडले यांची  गुप्त वार्ता कक्षाकडे बदली करण्यात आली आहे. यांना केले कार्यमुक्त :  उपनिरीक्षक अमोल शिंदे, मनोज कांबळे, सिद्धेश्‍वर आखेगावकर, सतीश डौले, जीवन राजगुरू, श्रीनिवास सावंत, अस्लम शेख, विजय चव्हाण, शिल्पा यमगेकर, समीक्षा पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मिरज शहरचे  निरीक्षक सदाशिव शेलार यांनाही कार्यमुक्त करण्यात आले आहे.

आणखी बदल्या शक्य

जिल्ह्यातील आणखी काही सहाय्यक  निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्याही विनंतीनुसार, प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात येणार आहेत. 15 दिवसांत याबाबतचे आदेश होण्याची शक्यता व्यक्त  होत आहे.  तसेच आणखी काही ठिकाणचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे.