Tue, Jul 16, 2019 02:10होमपेज › Sangli › कासेगावमध्ये व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त बंद

कासेगावमध्ये व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त बंद

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

कासेगाव (ता. वाळवा) येथील भैरवनाथ पाणी संस्थेच्या अन्याय्य कारभाराच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी मंगळवारी  उत्स्फूर्त बंद पाळला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी बुधवारी  चावडी चौकात जाहीर सभा होत आहे, अशी   माहिती श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. भैरवनाथ  संस्थेच्या कारभाराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचे  नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू आहे. इस्लामपूरच्या सहाय्यक निबंधक यांनी पाच सभासदांची वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याचे आदेश दिले होते.

यापूर्वीही निबंधकांनी आदेश दिले असतानाही संस्थेने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवले आहे. मंगळवारी गावातील सर्व व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.  बुधवारच्या जाहीर सभेत संस्थेने नवीन सभासद करून घेण्यासाठी अटी घातल्या आहेत. त्या कागदपत्रांची होळी करण्यात येणार आहे. तसेच याबाबत प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होणार आहे.