Fri, Sep 21, 2018 11:59होमपेज › Sangli › मुस्लिम आरक्षणासाठी उद्या सांगलीत उपोषण

मुस्लिम आरक्षणासाठी उद्या सांगलीत उपोषण

Published On: Aug 15 2018 1:25AM | Last Updated: Aug 14 2018 9:25PMसांगली : प्रतिनिधी 

मुस्लिम आरक्षण व विविध मागण्यांसाठी मुस्लिम अधिकार आंदोलनाच्यावतीने गुरुवारी (दि. 16) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मुनीर मुल्ला यांनी दिली. 

उच्च न्यायालायाने मंजूर केलेले व मागासवर्गीय आयोगाने शिफारस केलेले मुस्लिम समाजासाठीचे शैक्षणिक व सरकारी नोकर्‍यांचे आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मेगा भरतीमध्ये मुस्लिमांचा सामावेश करावा, जिल्ह्यामध्ये एका पोलिस अधिकार्‍यांची नोडल पोलिस अधिकार्‍याची नियुक्‍ती करून तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील सर्व अतिक्रमणे दूर करावी, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करावे, महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथिल कराव्यात, सच्च कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिटीचा अहवाल स्वीकारून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.