होमपेज › Sangli › शौचालय अनुदान लाटले; 38 जणांवर गुन्हा

शौचालय अनुदान लाटले; 38 जणांवर गुन्हा

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:49PMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा हजार रुपये अनुदान दिले होते. मात्र, अनुदान घेऊनही शौचालय न बांधणार्‍या 38 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लिपिक प्रताप घाटगे यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : नगरपालिकेकडून 2016-17 मध्ये हागणदारीमुक्‍त तासगाव शहरासाठी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान आणि नगरपालिकेकडून पाच हजार रुपयांचे विशेष अनुदान देण्यात येणार होते. शहरातील अकराशे लोकांना  शौचालयांसाठी या अनुदापैकी पहिला हप्ता म्हणून सहा हजार रुपये दिले होते; मात्र प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान घेऊनही 38 लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नाही. पालिकेकडून या लाभार्थ्यांना शौचालय बांधा; अन्यथा अनुदान परत करा, यासाठी सातत्याने तगादा लावला होता. मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले.

अखेर गुरुवारी पालिकेच्यावतीने प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान लाटणार्‍या 38 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेले नागरिक असे  ः विष्णू आनंदा गायकवाड, संजय गणपती सावंत, सिराज आब्बास शेख, वैशाली प्रभाकर देसाई, अकबर शौकत मुजावर, कबीर शौकत मुजावर, गुलाब हुसेन कोकणे, किशोर पंडित देवकुळे, सुभाष बाजीराव लुगडे, पोपट शामराव चव्हाण, सुहास शिवाजी डिसले, पंडित केशव शिंदे, सतीश विठ्ठल शिंदे, सतीश रामचंद्र माळी, श्रीकांत गणपती माळी, संतोष शंकर चव्हाण, विनायक शंकर चव्हाण, आरशद निजाम मुल्‍ला, एैरावती गौरीहर माळी, महेश दत्तात्रय खेराडकर, पिंटू नागेश धनवडे, कलावती एकनाथ शिंत्रे, महमंद अजी म. अब्बास मुजावर, प्रकाश आकाराम देवकुळे, कृष्णाबाई शामराव जाधव, रामचंद्र विश्‍वनाथ पैलवान, राजाराम दाजी जाधव, रुक्मिणी नारायण शिंदे, प्रदीप महादेव माळी, रमेश पंडित देवकुळे, सदाशिव शंकर माळी, भारती ज्ञानेश्‍वर कदम, दिलावर अमीर पठाण, सचिन पतंगराव निकम, जैनुन अजिज कालेकर, किफायतुल्‍ला रज्जाक कोकणे, इक्बाल महंमद कोकणे, सिंधू विलास माळी.