Thu, Jun 20, 2019 01:43होमपेज › Sangli › उसाबाबत सरकार उदासीन

उसाबाबत सरकार उदासीन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुंडल : वार्ताहर 

आज जागतिक बाजारपेठेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे आता बांधावर उभे राहुन  शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. कष्टाशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय उन्नती नाही, तर याच काळात उसाबाबत शासन उदासीन आहे. साखरेचे दर कमी होत आहेत, असे परखड प्रतिपादन  क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी केले. क्रांती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ऊस पीक चर्चासत्रामध्ये लाड बोलत होते. वसंतदादा साखर संघातील  शास्त्रज्ञ डॉ. डी. बी. फोंडे, ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ पी. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळरी बोलताना अरूणअण्णा लाड म्हणाले, सध्या राज्यकर्त्यांच्या धोरणामूळे आणि उसपीकांबाबतच्या अनास्थेमुळे शेतकरी आणि कारखाने आर्थिक आरिष्टात सापडले आहेत. क्रांती कारखान्याने सातत्याने ऊस विकास योजना राबविल्या आहेत. या पायलट योजनेमध्ये जो शेतकरी आपले ऊसक्षेत्र नोंद करेल ते ऊस क्षेत्र तोडणीसाठी 15 दिवस अगोदर नोंद घेतली जाईल. पाचट ठेवलेल्या क्षेत्रामधील उसाच्या तोडणीसाठी 10 दिवस अगोदर नोंद घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातील उसउत्पादकांनी याची दखल घेण्याचे त्यांनी आवाहनकेले.

डॉ.  फोंडे म्हणाले, ऊस दर हा साखर उतारा आणि उत्पादकता या दोन्हीवर अवलंबून असतो. यासाठी आता अधिक  साखर उतारा असलेल्या उसाच्या वाणाची लागवड करण्याची गरज आहे. एकरी सरासरी 40 हजार ऊससंख्या आवश्यक आहे. जादा उत्पादनासाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर घातक आणि चुकीचा आहे. जोपर्यंत एकरी 40 मे. टन उत्पादन मिळते तोपर्यंत खोडवे घेणे आवश्यक आहे. 
उसाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडत असेल तर त्याच्यावर पोटॅशची फवारणी केल्याने तसेच कारखान्यामधील राख शेतामध्ये पसरुन त्याची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, असे तेम्हणाले.

ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ पी. टी.पाटील म्हणाले, शेतकर्‍यांनी कीटकनाशकाचा वापर काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.  कोणत्याही किडीची अवस्था लक्षात घेऊन कीटकनाशक फवारावे. ऊस शेतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुमणी किडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र क्रांती कारखान्याने हुमणी नियंत्रणाबाबत चांगले प्रयत्न केले असल्याने त्यांनी कारखान्याचे कौतुक केले. क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, रणजीत लाड, सरपंच प्रमिला पुजारी, पी. पी. कुंभार, वसंतराव लाड, उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड उपस्थित होते. 

Tags : Sangli, Sangli News, competition, field, global market 


  •