Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Sangli › भिडे समर्थकांचा आज सांगलीत महामोर्चा

भिडे समर्थकांचा आज सांगलीत महामोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शहरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी शक्‍तिप्रदर्शन करत शहरातून संचलन केले. 

कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल भिडे यांच्यासह मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकबोटे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मात्र भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने संपूर्ण राज्यभर सन्मान मोर्चाचे आयोजन केले आहे. सांगलीतही बुधवारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

सकाळी दहाच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात जाणार आहे. तेथे निवेदन वाचन झाल्यानंतर मोर्चाचा समारोप होणार आहे. 

कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत संभाजी भिडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातून त्यांना दोषमुक्त करून शासनाने त्यांचा सन्मान करावा अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय तेथील दंगलीत ठार झालेल्या राहुल फटांगरेच्या मारेकर्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. 3 जानेवारीच्या बंदवेळी सांगलीसह राज्यात झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

दरम्यान या मोर्चासाठी जिल्हाभरातून भिडे यांचे समर्थक येणार आहेत. त्यासाठी नेमिनाथनगर, आंबेडकर स्टेडियम, इमॅन्युएल मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Tags : sangli, sangli news, Bhide supporter, Maha Morcha, Today, 


  •