Wed, Feb 20, 2019 21:35होमपेज › Sangli › आज महापौर, उपमहापौर उमेदवारीचा होणार फैसला

आज महापौर, उपमहापौर उमेदवारीचा होणार फैसला

Published On: Aug 15 2018 1:25AM | Last Updated: Aug 14 2018 11:15PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत सत्तांतरानंतर भाजपतर्फे पहिले महापौरपद मिळावे यासाठी रस्सीखेच सुरू आहे. पक्षातर्फे सात नगरसेविका इच्छुक आहेत. त्यापैकी कोअर कमिटीने चौघींची शिफारस केली आहे. 

महापौर आणि  उपमहापौरपदासाठीच्या उमेदवारीचा फैसला बुधवारी होणार आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख  यांच्या उपस्थितीत कोअर कमिटी आणि पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे.  दोन्ही पक्षांकडून गुरुवारी (दि. 16) दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. महापौर-उपमहापौर निवड 20 ऑगस्ट रोजी दुपारी 11.30 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पदांच्या निवडीचे सर्वाधिकार सांगलीतील कोअर कमिटीला दिले आहेत. त्यानुसार कोअर कमिटीची बैठक होऊन सौ. संगीता खोत, कल्पना कोळेकर, सविता मदने आणि अनारकली कुरणे या चौघींच्या नावांची शिफारस  प्रदेश कार्यकारिणीकडे केली आहे असे समजते.