Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Sangli › विकासासाठी राजकारण बाजूला ठेवू

विकासासाठी राजकारण बाजूला ठेवू

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:40PMमिरज : शहर प्रतिनिधी 

विकासासाठी राजकारण बाजूला ठेवण्याचा या पूर्वीच्या ज्येष्ठ नेत्यांचा आदर्श आहे. तोच आम्हीही ठेवू, असे प्रतिपादन खासदार संजय पाटील व आमदार विश्‍वजित कदम यांनी रविवारी येथे केले.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवारात स्व. डॉ. पतंगरावजी कदम बहुउद्देशीय व्यापारी संकुलाचे रविवारी दुपारी भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार संजय पाटील, कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील, आमदार विश्‍वजित कदम यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार मोहन कदम हे होते. 

खासदार पाटील म्हणाले, बाजार समिती जेव्हा अडचणीत आली होती. त्यावेळी आम्ही आमचे पक्ष बाजूला ठेवून सगळे एकत्र आलो होतो.  पुढेही असेच एकत्र काम करू. दिवंगत सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून विकास करण्याची संस्कृती शिकविली आहे. ती आम्ही तशीच पुढे नेऊ. विश्‍वजित कदम म्हणाले, आम्ही राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू. यावेळी आ. उल्हास पाटील, जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महावीर कागवाडे, विक्रम सावंत, सिकंदर जमादार, बसवेश्वर सातपुते, उमेश पाटील, बाजार समितीचे उपसभापती तानाजी पाटील, बाजार समितीचे सचिव एन. एम. हुल्याळकर, सहायक सचिव डी. बी. जाधव, सदस्य संतोष पाटील, कुमार पाटील, रामगोंडा संती, पी. एन. पाटील उपस्थित होते.