Tue, Mar 19, 2019 15:57होमपेज › Sangli › तीन चोरट्यांना इस्लामपुरात अटक

तीन चोरट्यांना इस्लामपुरात अटक

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 12:13AMइस्लामपूर : वार्ताहर

इस्लामपूर पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला आहे. त्यांच्याकडून 7 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

विजय शंकर भोसले, दिग्विजय अशोक पाटील (वय 21, दोघेही रा. चिकुर्डे), ओंकार प्रशांत जाधव रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून  पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पत्रकार बैठकीत माहिती  दिली की, पोलिसांचे पथक गस्त घालत होते. दि.20 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर -शिवपुरी रस्त्यावर दुपारी दोघे तरुण मोटरसायकलवरून संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले.  पाठलाग करून दिग्विजय पाटील याला ताब्यात घेतले.      

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांसह इस्लामपूर, कोडोली, कोल्हापूर येथून मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. विजय भोसले व ओंकार जाधव यांना रविवारी सापळा लावून अटक केली. मोटारसायकल चोरून त्यांचे स्पेअर पार्ट ते विक्री करत होते. 

पोलिस हेड काँस्टेबल कृष्णा पवार, संतोष देसाई, मोहसीन मुल्‍ला, दीपक पाटील, जमीर मुलाणी, गणेश शेळके यांच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. अटक केलेल्या जाधव व भोसले यांना  न्यायालयाने  तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  मात्र भोसले याची 12 वीची परीक्षा असल्याने त्याला  जामीन मंजूर केला.