होमपेज › Sangli › त्या महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

त्या महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 10:35PMसांगली : प्रतिनिधी

कर्नाटकातील अल्पवयीन मुलीला सांगलीत आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी संशयित महिलेचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. सी. पवार यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी मालन चनाप्पा पुजारी (वय 40) या महिलेला अटक केली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी न्या. पवार यांच्यासमोर सुनावणी झाली. 

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा तसेच अनैतिक मानवी व्यापाराचा आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या जामिनाला हरकत घेतली होती.  त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. शिवाय तिने मुलीचा ताबा मिळण्यासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला. पीडित मुलीची बाल सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विशाखा भरते, अ‍ॅड. एस. एम. पखाली यांनी काम पाहिले. सामाजिक संस्थेतर्फे अ‍ॅड. वंदना चिवटे, अ‍ॅड. श्रीकांत कदम यांनी काम पाहिले.