Mon, May 27, 2019 09:20होमपेज › Sangli › रस्तेकामांचे थर्डपार्टी ऑडिट होणारच 

रस्तेकामांचे थर्डपार्टी ऑडिट होणारच 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी

झालेल्या रस्तेकामांच्या रकमा एक रुपया असो वा 50 लाख. थर्डपार्टी ऑडिट करणारच, असे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी सोमवारी महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत स्पष्ट केले. थकित 30 कोटी रुपयांची बिले आणि थर्डपार्टी ऑडिटची अट शिथिल करावी यासह अनेक मगाण्या ठेकेदार संघटनेने केल्या. अर्थात 30 कोटीपैकी 6 कोटींची बिले देऊ, असे खेबुडकर यांनी स्पष्ट केले.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष सज्जन पाटील म्हणाले, कायद्यानुसार एक लाखापर्यंत कामांची थर्डपार्टी ऑडिटची तरतूद नाही. कोणत्याही 5 लाख रुपयांच्या वरील कामांत थर्ड पार्टी ऑडिटची तरतूद आहे. त्यानुसार थर्डपार्टी ऑडिट जरूर करावे. पण बिले वेळेत मिळत नाहीत. आम्ही कमी निविदांनी कामे करतो. त्यातून पुन्हा थर्डपार्टी ऑडिटचा खर्च आम्ही कशासाठी द्यायचा? असा सवालही केला.

रवी केंपवाडे म्हणाले, यावेळेचा खर्च तुम्ही करा, पुढील कामांत टेंडरमध्ये थर्ड पार्टी ऑडिटच्या रकमेचा समावेश करू, असे खेबुडकर यांनी स्पष्ट केले आहे. मार्चनंतर 15 दिवसांत थकीत बिले दिली जात होती. पण आता 2 महिने उलटून एक पैही मिळालेला नाही. कामगारांची देणी आणि पुढील कामे कशी करायची?

जाफर रंगारी म्हणाले,  कायद्यानुसार थर्ड पार्टी करा, पण त्यासाठी  10 टक्के बिलांची रक्कम ठेवून घ्या. उर्वरित 90 टक्के रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी केली. पण निधी नसल्याने टप्प्या-टप्प्यानेच बिले देऊ 30 कोटीपैकी 5 कोटी आता देऊ, उर्वरित निधी टप्प्या-टप्यानेच देणार अशीच भूमिका घेतली. 

सज्जन पाटील म्हणाले, बांधकामाच्या बिले अडवाअडवी आणि कामांच्या तपासणीचाही पाढा आयुक्‍तांसमोर मांडला. झालेल्या कामांची तपासणी करण्यासाठी शहर अभियंता प्रत्येक साईटवर यायला 15 दिवस लागतात. मग उपअभियंता, शाखा अभियंता आहेत कशाला? एक तर झालेल्या कामांची ज्या-त्यावेळी तपासणी करावी. अन्यथा अन्य अधिकार्‍यांकडून तपासणी करून तपासणी करावी. कनिष्ठ अभियंता बिले लवकर उतरत नाहीत, अशाही तक्रारी खेुबडकर यांच्यासमोर केल्या. यावेळी खेबुडकर यांनी 8 दिवसांत बिले न नोंदविल्यास अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. यावेळी आनंदा म्हारगुडे, साजिद शेख, सिद्धार्थ कुदळे, गजानन साळुंखे, अजित जाधव आदी उपस्थित होते.