Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Sangli › मतदार याद्यांमध्येही घोळ सुरूच

मतदार याद्यांमध्येही घोळ सुरूच

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:53PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभागनिहाय प्रारूप ऑनलाईन याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु मुळात प्रभाग रचना करतानाच कोणताही अभ्यास न करता केल्यामुळे या याद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी केला. ते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया राबविताना अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास असणे आवश्यक असते. प्रभाग रचनेपासून ते निवडणूक होईपर्यंत सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागते. परंतु महापालिका प्रशासनाने कोणताही अभ्यास न करता ही रचना केली असून, त्याचा परिणाम आता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरही दिसून येत आहे. 

मतदार संख्येच्या प्रमाणात प्रभागांची रचना आणि सदस्य संख्या निश्‍चित करणे आवश्यक आहे. असा नियम सुद्धा आहे. परंतु प्रभाग रचना व लोकसंख्येचा कोणताही अभ्यास न करता महापालिकेने मनमानेल तसे रचना व सदस्य संख्या केलेली दिसून येते. प्रभाग 13 हा सांगलीवाडीचा भाग आहे आणि प्रभाग 20 हा मिरजेकडील भाग आहे. या ठिकाणीच मतदारसंख्या अनुक्रमे 14, 320 व 18036 आहे. या ठिकाणी सदस्यसंख्या ती प्रत्येकी तीन अशी केलेली आहे. परंतु प्रभाग 8 ची मतदार संख्या 16,559 आहे, तर प्रभाग 18 ची मतदार संख्या 17,850 इतकी आहे. या ठिकाणी सदस्य संख्या मात्र चार आहे. वास्तविक पाहता या दोन प्रभागात मतदारांची संख्या 20 पेक्षा जास्त असतानाही सदस्य मात्र जास्त दिलेले आहेत. त्यामुळे प्रभाग 20 मधील लोकांवर हा अन्याय आहे.  त्यामुळे निवडणूक आयोगाचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले दिसत नाहीत.  या संदर्भात लोकांनीच हरकती दाखल केल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.