Sat, Feb 16, 2019 04:39होमपेज › Sangli › माडग्याळमध्ये मोबाईल शॉपी फोडली

माडग्याळमध्ये मोबाईल शॉपी फोडली

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 12:07AMमाडग्याळ : वार्ताहर

माडग्याळ (ता. जत) येथील बसस्थानक परिसरात मेडिकल दुकान व मोबाईल शॉपीचे  फोडून  चोरट्यांनी 26 हजार रोकडसह दहा महागडे मोबाईल असा एकूण सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही चोरी झाली. या  घटनेने माडग्याळमध्ये खळबळ उडाली आहे.

सदाशिव माळी यांचे बसस्थानकजवळ सिध्देश्‍वर मेडिकल या नावाचे औषध दुकान आहे. माळी हे सकाळी   दुकान उघडण्यास आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. यावेळी दुकानात ठेवलेले 22 हजार रुपये तसेच स्टेशनरी साहित्य चोरण्यात आले. एकूण 30 हजारांचा ऐवज चोरट्यांनी  लंपास केला. 

त्यानंतर शेजारीच ब्रम्हदेव माळी यांचे भाग्यवंती मोबाईल शॉपी व फोटो स्टुडीओमध्ये चोरांनी कुलूप तोडून प्रवेश केला. तेथे दुरूस्तीसाठी आलेले 10 स्मार्ट मोबाईल फोन तसेच 3500 रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. एकूण   90 हजारापर्यंतचा ऐवज लंपास केला. दोन्ही घटनांत एकूण एक लाख वीस हजारांपर्यंतचा ऐवज चोरांनी लुटला. 

सकाळी 10 वाजता उमदी पोलिसांनी माडग्याळमध्ये येऊन फोडलेल्या दुकानाची पाहणी करून माहिती घेतली. माडग्याळमध्ये पोलिस औटपोस्ट असूनसुध्दा जवळच चोरी झाल्याने येथे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.