Thu, Jun 27, 2019 01:57होमपेज › Sangli › सांगली मार्केट यार्डात चार दुकाने फोडली

सांगली मार्केट यार्डात चार दुकाने फोडली

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:18AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मार्केट यार्डातील तीन दुकाने बुधवारी रात्री एकाच रात्रीत फोडण्यात आली. यामध्ये एक लॅपटॉप, संगणक, दोन हजारांची रोकड असा सत्तर हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान, संतप्त व्यापार्‍यांनी चोर्‍यांचा छडा लागेपर्यंत व्यापार बंद करायचा निर्णय जाहीर केला आहे.

याप्रकरणी जलाराम ट्रेडिंग कंपनीचे चालक शिवाजी हणमंत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. मार्केट यार्डमधील पाचव्या गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ पाटील यांचे जलाराम ट्रेडिंग कंपनी, महेंद्र तोष्णीवाल याचे रामकरण तोष्णीवाल आणि कंपनी, मक्शी ट्रेडिंग कंपनी ही गूळ व्यापार्‍यांची दुकाने  रात्री  बंद करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. 

चोरट्यांनी पाटील यांचे दुकान फोडून लॅपटॉप लंपास केला.  लोखंडी तिजोरी फोडून त्यातील साहित्य विस्कटले होते. तोष्णीवाल यांच्याही दुकानातील तिजोरी फोडण्यात आली होती. एक संगणक लंपास करण्यात आला. मक्शी ट्रेडिंग कंपनीतून  रोकड लंपास करण्यात आली. 

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी हातांचे ठसे घेतले आहेत. श्‍वानपथक रेल्वे स्टेशन रस्त्यावरील गल्लीपर्यंत जाऊन  घुटमळले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मार्केट यार्डात गेल्या दोन वषार्ंत चोरीचे पस्तीस ते चाळीस प्रकार घडले आहेत. एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले होते. बुधवारी व्यापार्‍यांनी हळद, गुळाचे सौदे काढले नाहीत. चेंबर ऑफ कॉमर्समध्ये व्यापार्‍यांची तातडीने बैठक झाली. चोरीचा छडा लागेपर्यंत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, दीपक चौगुले, प्रशांत पाटील, गोपाळ मर्दा, मुजीर जांभळीकर, भगवान सारडा, समीर साखरे, रमणिक दावडा, आण्णासाहेब चौधरी, सचिन घेवारे, शीतल पाटील व व्यापारी उपस्थित होते.