Thu, Apr 25, 2019 18:05होमपेज › Sangli › हॉटेल व्यावसायिकाची दोन लाखांची बॅग लंपास

हॉटेल व्यावसायिकाची दोन लाखांची बॅग लंपास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज ः शहर प्रतिनिधी

येथील मार्केट परिसरामध्ये उभ्या केलेल्या कारमधून दोन लाख 16 हजार 700 रुपयांची रोकड असणारी बॅग चोरट्यांनी लंपास केली. ती बॅग विश्रामबागच्या हॉटेल व्यावसायिकाची आहे. सोमवारी सकाळी दहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत बाळासाहेब वसंत इंगवले (वय 39, रा. सावरकर कॉलनी, सांगली) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे मिरज-पंढरपूर रस्त्यावर हॉटेल आहे. त्या हॉटेलसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी ते कारमधून (एम.एच.10 सी.ए. 1116) मिरजेत आले होते. त्यांनी काळ्या रंगाची बॅग गाडीच्या पुढच्या सीटवर ठेवली होती. त्यामध्ये रक्‍कम होती. त्यातील साडेदहा हजार रुपये घेऊन त्यांनी स्टेशन चौकात खरेदी केली. त्यानंतर ते गाडीतून मार्केटजवळच्या दर्ग्याजवळील एका दुकानात गेले. तेथेही त्यांनी खरेदी केली. त्यानंतर ते गांधी चौकातील चिकन सेंटरजवळ गेले. तेथे चिकन घेण्यासाठी खिशातील पैसे त्यांनी दिले. चिकन घेतल्यानंतर ते गाडीत  बसले. त्यावेळी त्यांची बॅग गाडीत नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी शोधाशोध केली; पण बॅग सापडली नाही. त्यामध्ये 100, 500, 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात रक्‍कम होती. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.