Fri, Apr 26, 2019 19:46होमपेज › Sangli › मिरजेत चोरीच्या 14 दुचाकी जप्त

मिरजेत चोरीच्या 14 दुचाकी जप्त

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:48PMमिरज : शहर प्रतिनिधी

मिरज शहर व अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या 14 दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी संशयित संपत माणिक देसाई (वय 27), भास्कर भारत झुरे (वय 23, दोघे रा. ढालगाव ता. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक सदाशिव शेलार यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, दि. 5 जूनरोजी नारायण कदम यांची दुचाकी मिरजेतून चोरीस गेली होती. ती चोरी संपत देसाई याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चोकशी केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार भास्कर झुरे याचे नाव सांगितले. त्या दोघांनी मिरज व अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3 दुचाकी ह्या मिरजेतून चोरल्या आहेत. तर  11 दुचाकी ह्या अन्य शहरातून चोरल्या आहेत. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलिस हवालदार लक्ष्मण जाधव व पोलिसांनी ही कारवाई केली.  गेल्या आठवड्यात मिरज शहरामध्ये विविध ठिकाणच्या दुचाकी चोरणार्‍या इरफान मन्सूर वाळवेकर (वय21), जमीर दस्तगीर वाळवेकर (वय 20, दोघे रा. कवठेगुलंद, जोग्याळ मळा, ता. शिरोळ) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शहर पोलिसांची गेल्या आठ दिवसातील दुचाकी चोरट्यांना पकडण्याची ही दुसरी कारवाई आहे.