Fri, Sep 20, 2019 04:41होमपेज › Sangli › चोरीच्या ११ मोटारसायकली जप्त

चोरीच्या ११ मोटारसायकली जप्त

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:33AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

चोरीची मोटारसायकल घेऊन एक संशयित जतमधील मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने पांडोझरीतील एकाकडून चोरीची मोटारसायकल खरेदी केल्याचे सांगितल्यानंतर पांडोझरीत छापा टाकून पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने मुख्य  संशयित पसार झाला. 

पोलिसांनी सावळा गोपाळ लोखंडे (रा. करेवाडी, ता. जत) याला अटक केली आहे. मुख्य संशयित गोविंद चव्हाण पळून गेला. मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना लोखंडे चोरीची मोटारसायकल घेऊन जत येथील मार्केट यार्डजवळ येणार असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली. 

त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने मार्केट यार्ड परिसरात सापळा लावला. लोखंडे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पांडोझरीतील चव्हाण याच्याकडून ती मोटारसायकल खरेदी केल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसराची पाहणी केली असता तेथे आणखी दहा मोटारसायकल असल्याचे दिसून आले. त्या चोरीच्या असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्या. चोरीची मोटारसायकल खरेदी केल्याप्रकरणी लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चव्हाणच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोटारसायकली मुंबई, सोलापूर, अकलूज, तिकोटा येथून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संशयित खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी

यामध्ये अटक करण्यात आलेल्या सावळा लोखंडे याच्यावर उमदी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा एप्रिलमध्ये दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता. या गुन्ह्यात तो अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex