Sun, Nov 18, 2018 09:39होमपेज › Sangli › तासगाव पंचायत समितीचे काम आदर्श 

तासगाव पंचायत समितीचे काम आदर्श 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तासगाव : प्रतिनिधी 

सांगली जिल्ह्यात तासगाव पंचायत समितीचे काम उत्कृष्ट आणि आदर्शवत आहे, असे प्रशस्तीपत्र तासगाव दौर्‍यावर आलेल्या पंचायत राज समितीने दिले.

या समितीच्या कारभारात आम्हाला शोधूनही चूक सापडली नाही, अशी प्रतिकिया पंचायतराज समितीचे गटप्रमुख आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केली. समितीने चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. पंचायत राज समितीत आमदार  सर्वश्री गोगावले, रणधीर सावरकर,  सुधाकर कोहळे, बाळाराम पाटील व किशोर पाटील यांचा समावेश होता.

आमदार सुमन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पंचायत समितीच्या सभागृहात विभागनिहाय कामाची तपासणी केली. शिक्षण विभागाच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. पंचायत समिती कामाचा संपूर्ण आढावा यावेळी घेण्यात आला. अधिकार्‍यांच्या कामात नीटनेटकेपणा आहे, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद सदस्य अर्जुन माने -पाटील, सभापती माया एडके, उपसभापती संभाजी पाटील, गट विकास अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते.