Wed, Jan 23, 2019 00:37होमपेज › Sangli › हळद बियाणावर पाणी मारून वाढविले जाते वजन

हळद बियाणावर पाणी मारून वाढविले जाते वजन

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:33PMसांगली : प्रतिनिधी

हळद बियाणावर पाणी मारून वजन वाढविले जात असल्याची तक्रार होऊ लागली आहे. संबंधित विक्रेत्यांवर सांगली बाजार समितीने लक्ष द्यावे. शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. संबंधित विक्रेत्यांना ताकिद द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सांगली मार्केट यार्डात काही विक्रेते हळद बियाणे विक्रीसाठी आणतात. दहा टनाच्या गाडीतील बियाणांवर पाणी मारले ते बियाणे चौदा टन होते. शेतकरी मार्केट यार्डातून ओले बियाणे 5 टन नेतो. काही दिवसात या बियाणाचे वजन 3 ते 4 टन भरते. वजनातील या तुटीमुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे, अशी तक्रार केली जात आहे. दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी व विक्रेत्यांना  ताकिद द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.