Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल

कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी बुधवारी चौथ्या दिवशी सलगरे येथील पाचव्या टप्प्यातून बाहेर पडले. दुपारी कोंगनोळी, बनेवाडी, हरोली, देशिंग परिसरात हे पाणी पोहोचले. तर कवठेमहांकाळ हद्दीत वीस किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचले आहे. 

बुधवारी रात्रीपर्यंत गव्हाण हद्दीत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. पाणी वेगाने केवळ मुख्य कालव्यातून पुढे सरकत आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील शाखा कालवे सुरू करताना अधिकारी व शेतकरी यांच्यात वादाचे प्रसंग घडत आहेत.  

सध्या योजनेचे पाणी मुख्य कालव्यातून सोडण्यात येत आहे. शाखा कालवे आणि उपकालवे सोडण्याकरिता नव्या शासन आदेशानुसार यावेळच्या आवर्तनासाठी 19 टक्के वीजबिल रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय ही रक्कम केवळ वीजबिल म्हणून स्वीकारली जाणार आहे. तर पाणीपट्टी वेगळी राहणार आहे. 

दरम्यान, हरोली भागात कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी कालव्याचे गेट स्वतः सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाहणी दरम्यान म्हैसाळ योजनेचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात शासन आदेश आणि शेतकर्‍यांची धारणा यातून वादावादीचे प्रसंग आज घडले आहेत. यातून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘म्हैसाळ’ योजनेच्या आवर्तनाने आज पाचव्या दिवशी गती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात 6, दुसर्‍या टप्प्यात 8, तिसर्‍या टप्प्यात 6, चौथ्या टप्प्यात 7 आणि पाचव्या टप्प्यात 5 पंप सुरू असून एकूण 32 पंप सुरू आहेत.

 

Tags : sangli, sangli news, Kavathe Mahankal, Mhaysal Scheme, 


  •