Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › दुचाकी-रिक्षा धडकेत तरुण जागीच ठार

दुचाकी-रिक्षा धडकेत तरुण जागीच ठार

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

सांगली-माधवनगर रस्त्यावर मीरा हाऊसिंग सोसायटीसमोर भरधाव मोटारसायकल आणि रिक्षा (छोटा हत्ती) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. उत्तम दत्तात्रय इंगळे (वय 35, रा. पंचमुखी मारुती रस्ता) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

इंगळे  खणभागातील पंचमुखी मारूती रस्ता परिसरात राहत होते. त्यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा होता.  ते मोटारसायकलवरून (एमएच 10 बीसी 5649) माधवनगरकडे निघाले होते. मीरा हाऊसिंग सोसायटीजवळच्या तीव्र वळणावर समोरून येणार्‍या रिक्षाला (एमएच 10 एक्यू 8822) त्यांची समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांचे डोके गाडीच्या हौद्यावर जोरात आदळले. डोके फुटल्याने मेंदू रस्त्यावर इतस्ततः विखुरला होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Tags : Sangli, Sangli, News ,The two-wheeler,  rickshaw accident, young man dies