Wed, May 22, 2019 16:40होमपेज › Sangli › कर्नाटकातील कारखान्यांनी थकविले बिले

कर्नाटकातील कारखान्यांनी थकविले बिले

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:16PMमांजर्डे :  वार्ताहर 

तासगाव तालुक्यातील अनेक गावातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची चालू हंगामातील जानेवारी महिण्यापासूनची  बिले मिळाली नसल्यामुळे ऊस उत्पादक संकटात सापडला आहे.उगार केम्पवाड, कागवाड यासह कर्नाटकातील अन्य कारखान्यांनी ऊसाची बिले थकवल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.कारखाण्यांनी तात्काळ बिले देऊन शेतकर्‍यांना वाचवावे अशी मागणी ऊस उत्पादक करीत आहेत.
तासगाव तालुक्यातील पेड,मोराळे,मांजर्डे, आरवडे,पुणदी,कौलगे ,खूजगाव,ढवळी,विसापूर,लिंब ,आळते,चिखलगोठण,वंजारवाडी या गावातील हजारो शेतकर्‍याचे बिल अजून अथणी शुगर्स केम्पवाड, शिरगुप्पी शुगर्स कागवाड आणि उगार शुगर्स या कारखाण्यांना दिड लाख मेट्रिक टन उसाचा पुरवठा मार्च अखेर पर्यंत तासगाव तालुक्यातून करण्यात आला आहे.या कारखाण्यांनी 7 जुलै ते 15 जानेवारी पर्यंत ची बिले दिली आहेत परंतु त्यानंतरची बिले अदयापही दिलेली नाहीत.

या कारखाण्यांच्या तासगाव येथील कार्यालयात बिले कधी मिळणार याबाबत चौकशी केली असता कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.कधी 15 दिवसात बिले तुमच्या खात्यावर जमा होतील असे तर कधी कर्नाटकातील निवडणुका संपल्यावर बिले मिळतील असे सांगून वेळ मारली जात आहे.सततच्या या उत्तरा मुळे शेतकरी कंटाळला आहे.मागील हंगामात जिल्ह्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी,महांकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ यासह अन्य कारखाण्यांनी अजूनही मागील हंगामाची बिले दिली नसल्याने शेतकर्‍यांनी आपला ऊस या कारखाण्यांना दिला नाही तर कर्नाटकातील खाजगी कारखाण्यांना दिला.पण आत्ता त्या कारखाण्यांनी सुद्धा बिले दिली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.पुढील हंगामात यांना ऊस द्यायचा का नाही याबाबत गावागावात चर्चा सुरू आहे.यांना ऊस देऊन आम्ही काय चूक केली काय असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

कर्नाटक मधील अनेक खाजगी साखर कारखाण्यांनी तासगाव तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांची ऊस बिले थकवकी आहेत.ही बिले तात्काळ द्यावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभारले. जे शेतकरी आमच्याबरोबर येथील त्यांचे थकीत बिल काढण्यासाठी संघटना कारखाण्यावर धडक मारेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.