Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Sangli › सर्वच पक्षांत फोडाफोडीच्या राजकारणाला गती

सर्वच पक्षांत फोडाफोडीच्या राजकारणाला गती

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 11:55PMमिरज : जे. ए. पाटील

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील गटातटाचे राजकारण गतीमान झाले आहे. सर्वच पक्षांत फोडाफोडीच्या राजकारणाला गती आली आहे.यावेळी प्रथमच भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अणि जनता दल (सेक्युलर) या पक्षातील 8 ते 10 प्रमुख आजी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांना फोडून भाजपने आपली रणनिती दाखवून दिली आहे. तसेच मनसेतून बाहेर पडलेल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना शिवसेनेनेही आपल्या गळाला लावले असून त्या पक्षानेही या निवडणुकीत आपली चुणूक दाखविण्याची संधी साधली आहे. जनता दलही बर्‍याच वर्षानंतर यंदा महापालिका निवडणुकीत आपली शक्ती अजमावणार आहे.

सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांची  संयुक्त  महापालिका असली तरी महापालिकेच्या कारभारावर  मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आपला वरचष्मा गेल्या वीस वर्षांत कायम ठेवला आहे. त्यामुळे महापालिका कारभारात ‘मिरज पॅटर्न’चा चांगलाच बोलबाला आहे. ‘मिरज पॅटर्न’ मधील नगरसेवक ज्या पक्षाच्या बाजूला जातील त्या पक्षाची सरशी आणि सत्ता असे समीकरण निदान आत्तापर्यंत तरी  होते.

सर्व शक्ती पणाला

गेल्या  तीन निवडणुकांत मिरजेतील नगरसेवकांच्या बळावर दोनदा काँग्रेस व एकदा महाआघाडीने महापालिकेत सत्ता मिळवली आहे. परंतु यावेळी मिरज पॅटर्नमधील प्रमुख आजी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना भाजपने ‘हायजॅक’ केले आहे. भाजपने या निवडणुकीत सर्व ‘शक्ती’ पणाला लावण्याचे ठरविले असल्याने एकमेकांविरुद्ध लढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.परंतु या आघाडीला अद्याप मूर्त स्वरुप आलेले नाही. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी मिरज पॅटर्नचा अनुभव यापूर्वी अनेकवेळा घेतला असल्याने यावेळच्या निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. मिरज पॅटर्नमधील एका गटाने भाजपमध्ये उघडपणे जाण्याऐवजी आपला वेगळा ‘संघर्ष’ सुरू करुन आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजप विरोधात  वरकरणी विरोधाची भूमिका असलीतरी अंडरग्राउंड राजकारणाचे वेगळेच संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची सारी सूत्रे आपल्या हाती घेतले आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी गेल्या महिनाभरात सांगली, मिरज, कुपवाडमध्ये अनेक सभा, बैठका घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. कुपवाड मधील दोन नगरसेवक त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय एकमुखी आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणार्‍या कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंपणे निवडणूक लढावावी, असा दबाव आहे.

डॉ. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील व हाफीज धत्तुरे यांच्या निधनानंतर काँग्रेसकडे एकमुखी नेतृत्व राहिलेले नाही. काँग्रेसच्या मुलाखती जोरदार झाल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करुन निवडणूक लढविण्याच्या भूमिकेत काँग्रेस आता आहे. आघाडीबाबतचा निर्णय दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये होणार होता. परंतु तो झाला नाही. त्यामुळे आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होण्याची शक्यता आहे.

मतांची विभागणी अटळ

भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेमध्ये एकत्र असले तरी महापालिका निवडणूक मात्र या दोन्ही पक्षाकडून वेगवेगळी लढविण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेनेही काही लढाऊ कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन चांगलीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढले तर मतांची विभागणी मात्र अटळ आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील यांनीही निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने मिरज आणि कुपवाडमध्ये तयारी चालविली आहे. भाजपविरोधात समविचारी पक्षाबरोबर जाण्याचा त्यांचा विचार होता. परंतु आघाडी करण्याच्या द‍ृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजून जनता दलाला फारसे गृहित धरल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रसंगी जनता दल स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. जनता दलाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रभागात बसू शकेल अशी परिस्थिती आहे.

कोणता हा झेंडा घेऊ  हाती...!

महापालिकेची स्थापना झाल्यापासून महाआघाडीचा एकवेळचा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेत राहिली आहे. परंतु यावेळची निवडणूक चौरंगी, पंचरीगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी आपल्याला  आणखी चांगला उमेदवार मिळतो का, याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्त्यांचा भाव वधारला असल्याचे दिसून येते. या कार्यकर्त्यांना सर्वच पक्षांतून मागणी होत असल्याने महापालिका निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊ  या संभ्रमात बरेच कार्यकर्ते आह