Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Sangli › किती आले, किती गेेले, समस्या कायम राहिल्या

किती आले, किती गेेले, समस्या कायम राहिल्या

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 7:35PMसांगली : गणेश कांबळे

पूर्वीचा प्रभाग क्रमांक 1 म्हणजे मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्लीपासून ते काकानगर तसेच वाल्मिकी आवासपासून माधवनगर जकात नाक्यापर्यंतचा भाग हा सध्या प्रभाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अनिता आलदर, बाळासाहेब काकडे व आशा शिंदे यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. या परिसरात धनगर, बुरुड, गोसावी, घिसाडी हा कष्टकरी समाज बहुसंख्येने आहे. भागातील समस्यांचा आढावा घेतल्यास मगरमच्छ कॉलनीच्या पूर्वेला असलेला पूरसंरक्षक भिंतीचा. पूर आल्यास पहिला फटका हा या परिसराला बसतो. त्यामुळे संरक्षण भिंतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याबरोबरच याच प्रभागात शेरीनाला येतो. शहरातील संपूर्ण दुर्गंधीयुक्‍त पाणी याच मार्गाने शेरीनाल्यामध्ये मिसळत असते. त्यामुळे अनेक साथीच्या आजाराचा धोका या परिसराला जाणवत असतो. 

प्रभागाच्या उत्तरेला काकानगर, रामनगर, संगमेश्‍वरनगर हा विस्तारीत गुंठेवारी भाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ते, पाणी आणि गटारींचा प्रश्‍न होता. पावसाचे पाणी साचून लोकांना विस्थापित होण्याची वेळ येत होती. सध्या या ठिकाणी रस्त्यांची कामे झालेली आहेत. परंतु गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. साफसफाई केली जात नाही. त्यामुळे आरोग्य धोक्यात आहे. विजेचे खांब नाहीत. लाईटची सोय नसल्याने या परिसरातील लोकांना रात्रीचा प्रवास करणेही धोक्याचे होत आहे.

मुलांसाठी क्रीडांगण, विरंगुळा, उद्याने यांचा विचारही झालेला नाही. शिंदे मळा, पंचशीलनगर, अजिंक्यनगर आदी परिसरातही गटारी अद्याप केलेल्या नाहीत. गवत वाढल्याने पाणी साचून डेंग्यूसारख्या साथीचे आजारात वाढ होत आहे. या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. या प्रभागात वाल्मिकी आवासचा भाग येतो. आयुक्‍तांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्साहात स्वत: पुढाकार घेऊन  येथील गटारी साफ करण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यानंतरही  मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ 
आहे.  

समस्या प्रभागाच्या 12

परिसर : मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, काकानगर, योगीराजनगर, साईनाथनगर, रामनगर, पंचशीलनगर, शिंदेमळा, शांतिनिकेतन, गोसावी गल्ली, वाल्मिकी आवास, मेंडुगळे प्लॉट.