Wed, Feb 20, 2019 16:51होमपेज › Sangli › कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद पाल्यांचा गौरव 

कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद पाल्यांचा गौरव 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 7:49PMइस्लामपूर : वार्ताहर

मुलांनी स्वत:ची क्षमता ओळखून  वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावे. समाजाची बांधिलकी जाणून समाजकार्यासाठी वेळ द्यावा, असे प्रतिपादन इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रोझा किणीकर यांनी केले. दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने  10 वी  12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या कस्तुरी क्‍लब सभासद  पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कुसुमगंध इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या शिवानी पाटील, डॉ. नीलिमा शहा तसेच प्रायोजक अमृतलाल जैन उपस्थित होते.  शिवानी पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी.  तंत्र कौशल्य आत्मसात करावे. या सत्कार कार्यक्रमासाठी न्यू मेट्रो  बुक्स अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे मालक अमृतलाल जैन यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. या स्टोअर्समध्ये बालवाडी ते कॉलेजपर्यंतची पुस्तके, वह्या, स्टोअर साहित्य, स्टेशनरी माफक दरात उपलब्ध असतात. कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी प्रास्ताविककेले. स्मिता पाटील यांनी आभार मानले.कमिटी मेंबर सुरेखा गायकवाड, आसिफा बागवान, वैशाली सांभारे, आशाराणी पवार आदी प्रमुख उपस्थित होत्या.