Sun, Jul 21, 2019 17:04
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगलीत आयर्विन पुलाच्या ओव्हरहेड पुलाला जीपची धडक

सांगलीत आयर्विन पुलाच्या ओव्हरहेड पुलाला जीपची धडक

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 8:03PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीतील आयर्विन पुलाजवळील सांगलीवाडीकडील बाजूस असणार्‍या ओव्हरहेड ब्रिजला (सीमा चिन्ह खांब) पिकअप जीपने धडक दिली. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सात हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.  

महाड येथील सावित्री पूल पुरात वाहून गेल्यानंतर सांगलीतील आयर्विन पुलाबाबतही चर्चा सुरू झाली. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर ओव्हरहेड ब्रिज (सीमा चिन्हाचे खांब) बांधण्यात आले. त्यामुळे ठरावीक उंचीपेक्षा अधिक उंची असलेली वाहने या पुलावरून जाऊ शकत नाहीत. त्यानंतर बायपास रस्त्याने अवजड वाहतूक वळविण्यात आली. 

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास पिकअप जीपच्या (एमएच 14 जीडी 2761) चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने त्याने सीमा चिन्हाच्या खांबाला धडक दिली. यामुळे खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 3 मार्च रोजी सांगली-कोल्हापूर रस्त्यावर उदगांव (ता. शिरोळ) येथे असणार्‍या रेल्वे हेडब्रिजला कंटेनरने धडक दिली होती. त्यानंतर दि. 4 रोजी टिळक चौकातील ओव्हरहेड ब्रिजला जीपने धडक दिली होती. आज पुन्हा सांगलीवाडीकडील बाजूच्या पुलाला जीपने धडक दिल्याने याची शहरात जोरदार चर्चा होती. एकाच महिन्यात दोनदा या घटना घडल्या आहेत. 

Tags : Sangli, Sangli News, The overhead bridge, near the bridge, was hit by pickup jeep