Thu, Feb 21, 2019 09:04होमपेज › Sangli › कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्‍तीची गरज

कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्‍तीची गरज

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 11:10PMबोरगाव : वार्ताहर

नदीकाठच्या गावांतील  ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था व लोकसहभागातून कृष्णा नदी प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी प्रयत्न करावेत,  असे आवाहन जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बोरगाव ग्रामपंचायतीस भेटीप्रसंगी व्यक्‍त केले. तसेच त्यांनी नदीकाठची पाहणी केली.

ते म्हणाले, नदीकाठच्या गावात सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित होते. यासाठी जिल्हा परिषदेकडून कृष्णा नदीकाठच्या गावांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वाळवा तालुक्यातील 24 गावेही नदीकाठावर येतात याची माहिती संकलित करणे, यासाठी प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान कक्ष आणि स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी दिलीप मस्के, सुहास गवळी, दीपक पाटील, विजय पाटील, विद्याधर चौगुले, अजित पाटील, प्रवीण दने यांनी  सांडपाणी नदीपात्रात मिसळते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. सरपंच जयंती पाटील,  प्रमोद शिंदे यांच्याहस्ते  सत्कार करण्यात आला.