Sun, Feb 17, 2019 23:20होमपेज › Sangli › बारामतीच्या तरुणाचा चिंचाळेत खून

बारामतीच्या तरुणाचा चिंचाळेत खून

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:51PMआटपाडी : प्रतिनिधी  

तालुक्यातील चिंचाळे येथील साठवण तलावात काशिनाथ महादेव गलांडे (वय 35, रा. निरा वाघळ, ता. बारामती, जि. पुणे) या तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह तलावात टाकला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चिंचाळे येथील पोलिसपाटील सचिन मंडले यांना चिंचाळे तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तलावात पाहणी केली असता पुरुषाचा मृतदेह आढळला. मृताच्या डोक्यावर शस्त्राचे  खोलवर घाव घातल्याचे आणि डोळ्याखाली व अन्यत्र मारहाण केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या तरुणाचा खून करून मृतदेह तलावात टाकल्याचे स्पष्ट झाले; परंतु तो  कोणाचा ते सुरुवातीस समजू शकले नव्हते. पोलिसांनी मृत व्यक्‍तीचे कपडे तपासले असता, ओळखपत्रावरून पोलिसांना हा तरुण बारामती तालुक्यातील असल्याचे समजले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी तपास करीत आहेत.