Fri, Nov 16, 2018 23:38होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर चाकूहल्ला

सांगलीत युवकावर चाकूहल्ला

Published On: May 01 2018 1:27AM | Last Updated: May 01 2018 1:22AMसांगली : प्रतिनिधी

तुझ्या मित्राची आमच्याकडे का चौकशी केली, या रागातून एका युवकावर चाकूहल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये राजू अशोक सोनुले (वय 19, रा. शंभर फुटी रस्ता) जखमी झाला आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास इंदिरानगर येथे ही घटना घडली. याबाबत सहा जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आबा पेंटर, अनिकेत जाधव, दीपक बल्लू गोसावी, दिनेश (पूर्ण नाव नाही), किरण लोंढे, सोम्या (पूर्ण नाव नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजू सोनुले याने फिर्याद दिली आहे. राजूचा मित्र प्रशांत चौगुले इंदिरानगरमध्ये राहतो. 

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याला भेटण्यासाठी राजू मोटारसायकलवरून इंदिरानगर येथे गेला होता. तेथे चौकात सर्व संशयित बसले होते. राजूने त्यांच्याकडे ‘प्रशांत कुठे आहे’, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने संशयितांनी ‘त्याची चौकशी आमच्याकडे का करतोस’, असा जाब विचारत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. आबा पेंटर याने चाकूने राजूच्या मान आणि पोटावर वार केले.