Mon, May 27, 2019 00:48होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’साठी एकरी 1200 ची तयारी

‘म्हैसाळ’साठी एकरी 1200 ची तयारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आरग : वार्ताहर 

‘म्हैसाळ’च्या  मुख्य कालव्यातून पोटकालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी एकरी बाराशे रुपये भरण्याची तयारी मिरज पूर्वभागातील शेतकर्‍यांनी केली आहे. चोवीस तासासाठी पाणी पाहिजे असल्यास जादा रक्‍कम भरण्याची सूचना पाटबंधारे शाखेने केली आहे.  त्यामुळे जशी मागणी तसे पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी टंचाई कायम राहिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य कालव्याची गळती काढल्याने गळतीला आळा बसला आहे.त्यासाठी 600 मायक्रॉनचा विशेष कागद वापरण्यात आला आहे.  गळती थांबली आहे.

आरगसह बेडग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना धावपळ करावी लागत आहे.बेडग येथे पाणी साठवण करण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  जाणवत आहे. भागात छोटे पाझर तलाव आहेत. पण यामध्ये कमी प्रमाणात पाणी साठविण्यात येते, त्यावरच या भागातील शेतीसाठी पाणी वापरले जाते. स्वतंत्र नळपाणी पुरवठा करणारी योजना सध्या पाण्याअभावी बंद राहिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना करावा लागत आहे.

म्हैसाळचे पाणी चौथ्या टप्प्यातून आरग (ता. मिरज) येथील मुख्य पाझर तलावामध्ये सोडण्यात आले नाही. फेब्रुवारीपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.वीजवितरण कंपनीच्या शाखेने गावाला पाणी पुरवठा करण्यार्‍या यंत्रणेची वीज तोडली होती. 7 लाखाच्या वसुली साठी वीजवितरणने वीज पुरवठा खंडित केला होता.  पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीमध्ये पाणीच शिल्लक नाही.

Tags : Sangli, Sangli News,  issue, drinking water, critical.


  •