Sat, Nov 17, 2018 12:05होमपेज › Sangli › निरक्षर महिला सरपंचाला ग्रामसेवकाने ५ लाखाला फसविले

निरक्षर महिला सरपंचाला ग्रामसेवकाने ५ लाखाला फसविले

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:54AMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यातील एका निरक्षर महिला सरपंचाला ग्रामसेवकाने 5 लाख रुपयांना फसवल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सविस्तर आणि सखोल चौकशी केली जाईल, असे राऊत यांनी सांगितले. 

जत तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी देखभाल खर्चाच्या 24 हजार 500 रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र ग्रामसेवकाने हा धनादेश फाडून पुन्हा हीच रक्कम दुसर्‍या धनादेशावर लिहून सरपंचांची स्वाक्षरी घेतली. मात्र ग्रामसेवकाने या धनादेशावर 24 हजार 500 रुपयांच्या पुढे 5 लाख ही रक्कम आकडी आणि अक्षरी लिहिली आणि पैस काढल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे आली आहे. महिला सरपंचांने स्वत: ही तक्रार बुधवारी राऊत यांच्याकडे दिली. यावेळी काही नेतेमंडळीही उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.