Mon, May 20, 2019 08:37होमपेज › Sangli › मराठा आरक्षणातील शिपाई नियुक्‍ती लटकली

मराठा आरक्षणातील शिपाई नियुक्‍ती लटकली

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 21 2018 9:11PMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणातील शिपाई भरतीतील तीन उमेदवारांच्या नियुक्त्या शासन दरबारी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत लटकल्या आहेत. जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवून दोन महिने झाले तरी ‘ग्रामविकास’ कडून निर्णय आलेला नाही. शासनाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सांगली यांच्याकडील मराठा उमेदवारांना मात्र न्याय मिळाला आहे. शिपाई भरतीचे रखडलेले नियुक्ती आदेश त्यांना नुकतेच दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सन 2014 च्या कर्मचारी भरतीत मराठा समाजासाठी 19 पदे आरक्षित होती. परीक्षेनंतर निवड यादी जाहीर झाली होती. मात्र त्यानंतर आरक्षणाला स्थगिती आली. त्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांवर पात्र पंधरा मराठा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले. मात्र शिपाई पदाचे नियुक्ती आदेश मागे ठेवले.

शिपाईंची पदे कमी झालेली आहेत. त्यामुळे या तीन उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावा किंवा कसे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेने दि. 18 जानेवारी 2018 रोजी शासनाकडे मागविले आहे. ग्रामविकास विभागाने अद्याप मार्गदर्शन दिलेले नाही. त्यामुळे शिपाईंची नियुक्‍ती रखडली आहे. सहायक समाजकल्याण आयुक्त सांगली कार्यालयाकडेही मराठा आरक्षणातील शिपाई नियुक्ती रखडली होती.‘डीपीसी’ च्या बैठकीनंतर या नियुक्तींचा मार्ग मोकळा झाला. नुकतेच त्यांनी उमेदवारांना नियुक्ती आदेश दिला आहे. जिल्हा परिषद मात्र शासन मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 

Tags : Sangli, Sangli News, The government, has changed, appointments, three candidates,  recruitment, Maratha Reservation