Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Sangli › सोन्याचा वर्षातील उच्चांकी दर

सोन्याचा वर्षातील उच्चांकी दर

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:24PMसांगली : प्रतिनिधी 

अमेरिका व सीरिया या देशातील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीत बाजारपेठेवर झालेला आहे. सोने व चांगलीच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ आली आहे. सोन्याचा दर 32 हजार 480 तर चांदीचा दर 40 हजार 800 इतका झालेला आहे. वर्षातील हा सर्वाधिक दर असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक असल्याने त्याचा परिणाम सराफ व्यवसायावर झालेला आहे. 

अमेरिकेचा सीरियावर झालेल्या हल्ल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठवर झालेला आहे. नोटाबंदी व जीएसटीनंतर हा दर 30 हजारावर  स्थिर झाला होता. वर्षभर 31 हजारापर्यंत दर स्थिर होता. सध्या लग्नाचा हंगाम आहे. या कालावधीत सोन्याचा दर 32 हजार 480 वर गेलेला आहे, तर चांदीचा दर 40 हजार 800 वर गेलेला आहे.  याचा फटका सराफ व्यावसायिकांना बसण्याची शक्यता सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने यांनी वर्तवली आहे.

2014-15 ला एक्साईज ड्युटी लागली त्यावेळी सोन्याचा दर 26 हजार 300 अधिक व्हॅट इतक्यापर्यंत खाली आला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षात हा दर वाढत राहिला. पीएनजीचे समीर गाडगीळ म्हणाले, लग्नसराईचे दिवस आहेत. खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. परंतु वर्षातील हा दर सर्वाधिक असल्याचे ते म्हणाले. 

Tags : sangli, sangli news, gold, High rate,  year,