Sat, Mar 23, 2019 16:15होमपेज › Sangli › कुपवाड : बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार

कुपवाड : बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Mar 01 2018 1:28AMकुपवाड : वार्ताहर 

शहरातील कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीमधील एकाने दारुच्या नशेत स्वत:च्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच मुलीवर कुर्‍हाडीने हल्ला करून तिला जखमी केले. नंतर स्वतः रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दि. 26 फेबु्रवारीरोजी हा प्रकार घडला. तो  बुधवारी उघडकीस आला.

या व्यक्तीने दारूच्या नशेत स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीने अत्याचारास प्रतिबंध करण्यास सुरुवात केल्यावर त्याने चिडून तिच्यावर  कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात  मुलीच्या हातावर व डोक्यात मार लागल्याने ती जखमी झाली आहे. 

यानंतर त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत तो जमिनीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्याला उपचारासाठी  मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात फिर्याद दिली आहे. कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे. 

हा प्रकार दि.26 फेब्रुवारी रोजी घडला होता.मात्र त्यापूर्वीही तोे गेल्या वर्षभरापासून तिला त्रास देत असल्याची तक्रार मुलीच्या आईने बुधवारी सायंकाळी पोलिसांत दिली आहे. हवालदार सुनीता धुमाळे तपास करीत आहेत.