Fri, May 24, 2019 21:08होमपेज › Sangli › म्हैसाळ योजनेला निधी कमी पडणार नाही : खा. पाटील

म्हैसाळ योजनेला निधी कमी पडणार नाही : खा. पाटील

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 1:06AMमिरज : प्रतिनिधी

पाण्याचे आणि बागायत पिकाचे नियोजन करुन शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचविणार असल्याचे कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी येथे  सांगितले.
सुमारे 24 लाख रुपये खर्च करुन नूतनीकरण करण्यात आलेल्या मिरज पंचायत समितीच्या (स्व.) वसंतदादा पाटील सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभापती जनाबाई पाटील व उपसभापती काकासाहेब धामणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

खासदार पाटील म्हणाले, म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकर्‍यांना महाग पडणार आहे. त्यामुळे पाण्याचे आणि बागायत पिकाचे नियोजन करणे आणि उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.  वर्ष ते दीड वषार्ंत टेंभू योजना पूर्ण होईल. म्हैसाळ  योजनेचे पाणी कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आणि योजनेचे पंप पूर्णक्षमेने चालविण्यासाठी  नियोजन केले जाईल. निधी कमी पडू दिला जाणार नाही. 

आमदार  खाडे म्हणाले, मिरज पंचायत समितीचा कारभार व्यवस्थित  सुरू आहे. प्रशासकीय कामाकाजाकरिता सध्याची कार्यालयीन इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव करण्यात आला.उपसभापती काकासाहेब धामणे  विक्रम पाटील यांचेही भाषण झाले.   गटविकास अधिकारी राहुल राकडे, विविध गावचे सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांचा कार्यक्रमावर बहिष्कार

सभागृहाच्या नूतनीकरण कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले  नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ अनिल आमटवणे, अशोक मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विरोधी दहा सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.