Mon, Sep 24, 2018 12:56होमपेज › Sangli › टोमॅटो, ढबू मिरचीच्या शेतीचे अर्थकारण बिघडले

टोमॅटो, ढबू मिरचीच्या शेतीचे अर्थकारण बिघडले

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 8:22PMलेंगरे : वार्ताहर

टोमॅटोचा दर पुन्हा घसरला आहे. तर ढबूचा मात्र दर वाढला आहे. मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने मिरचीचा दर वाढूनही शेतकर्‍यांचा खिसा रिकामाच आहे. टोमॅटो, ढबू शेती तोट्यात आहे.खानापूर तालुक्यात उन्हाळी हंगामात आगाप टोमॅटो, ढबू मिरचीची सुमारे सातशे एकर क्षेत्रात लागवड झाली. तोडणी सुुरू झाली आहे.  महिनाभर ढबूला आठ ते बारा रुपये, टोमॅटो दहा ते पंधरा रुपये किलो दर होता. या दरात दोन्ही पिकांची शेती न परवडणारी होती. टोमॅटोच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सात ते दहा रुपये किलो दराने  विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे  ढबू मिरचीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. पण मिरचीवर थ्रिप्स, मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने झाडांची वाढच थांबली आहे. यासाठी महागडी औषधे फवारावी लागत आहेत.